त्रिविध ताप

त्रिविध ताप
Photo by Prajwal Sambhare / Unsplash

सर्वप्रथम हे जगचं दुःखमय आहे आणि मनुष्याची संसाराबद्दलची आसक्ती हेच दुःखाचे मूळ कारण आहे.

मनुष्य जन्माला येताना आपले पूर्व जन्मीचे प्रारब्ध घेऊनच येतो. पूर्व जन्माचे प्रारब्ध स्वरूप त्याला त्याचे फळ मिळते ज्या मुळे त्याला सुख किंवा दुःख भोगावे लागले. मनुष्य त्याच्या आयुष्यात जी नाना तरेची दुःख भोगतो त्याचे तीन प्रकारात वर्णन संतांनी करून ठेवले आहे. ते खालील प्रमाणे -
१.⁠ ⁠आध्यात्मिक ताप
२.⁠ ⁠आदिभौतिक ताप
३.⁠ ⁠आदिदैविक ताप

आध्यात्मिक ताप
मनुष्याला त्याच्या शरीर रूपाने होणाऱ्या त्रासाला अध्यात्मिक ताप असे म्हणतात. जसे की शरीराचे संतुलन बिघडले आणि थंडी वाजून येणे, ताप येणे, कणकण येणे किंव्हा वृद्धापकाळात मनुष्याला विविध व्याधी जडतात वगैरे वगैरे.अशा तापाद्वारे मनुष्याचे शरीर, इंद्रिय आणि मन दुःख भोगतात. साधारण पणे तुम्ही केलेलच्या पूर्व जन्माच्या चुकांची भरपाई करण्याची वेळ येते तेंव्हा अशा प्रकारचे अध्यात्मिक ताप बळावतात.

आदिभौतिक ताप
ज्यावेळी मनुष्य सृष्टीतील सजीव अथवा निर्जीव वस्तू द्वारे दुःख भोगतो त्याला आदिभौतिक ताप असे म्हणतात. उदाहरणार्थ चालत असताना दगडाला ठेच लागून पायाच्या अंगठ्याला दुखापत होणे. रस्त्यात कुत्रा चावून दुखापत होणे. वाहनाचा अपघात होऊन दुखापत होणे. अशा तापाद्वारे मनुष्याचे शरीर, इंद्रिय आणि मन दुःख भोगतात.

आदिदैविक ताप
जेंव्हा मनुष्य मरण पावतो तेंव्हा सुद्धा अशी कशी कर्म असतात ज्याची फळे तो विविध लोकात सूक्ष्म शरीर द्वारे भोगतो. उदाहरणार्थ नरक लोक.

मनुष्याने आपल्याला होणाऱ्या दुःखातून अंतर्मुख व्हावे आणि शाश्वत सुखाचा शोध घ्यावा.

  • मी देह नसून आत्मा आहे, हे लक्षात घेतल्यास आध्यात्मिक ताप संपेल.
  • जग मिथ्या आहे याचा अनुभव घेतल्यास आधिभौतिक ताप संपेल.
  • निर्वासन म्हणजे मृत्यु झाल्यावर पुनर्जन्म टळल्यास आधिदैविक तापातून सुटका होईल.

-सदगुरु कर्ता